भारतात वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात. काही खूप विषारी असतात तर काही बिनविषारी असतात.त्यामुळे साप चावल्यावर काय केलं पाहिजे हे जाणून घ्या.जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्या व्यक्तीने घाबरून जाऊ नये. कारण माणूस घाबरतो तेव्हा त्याचे हृदयाचे ठोके वाढतात. यामुळे विष अजून गतीने शरीरात पसरतं.ज्या जागी साप चावला तो भाग दोरीने बांधून ठेवा ज्यामुळे विष अजून शरीरात पसरणार नाही.यानंतर साप जेथे चावला आहे त्या भागाच्या आजूबाजूला दाबून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. जेथे साप चावतो त्या भागात विषाचं प्रमाण अधिक असतं.जर माणसाचं शरीर काळे पडायला सुरुवात झाली तर समजा विष शरीरात पसरलं आहे. अशा वेळी लगेचच त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहचवा.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews